मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस

मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस (मराठीत:मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था) (MP-IDSA) ही आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषतः संरक्षण, धोरणात्मक आणि सुरक्षा मुद्द्यांवरील प्रगत संशोधनासाठीची एक भारतीय थिंक टँक (वैचारिक संस्था) आहे. ही संस्था भारतीय सरकारच्या नागरी, लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देखील देते. ही संस्था निपक्षपाती आणि स्वायत्त आहे. तिला भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून निधी दिला जातो.

संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर संशोधन करून आणि धोरणकर्ते व सामान्य जनतेमध्ये त्या ज्ञानाचा प्रसार करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

सध्याचे महासंचालक राजदूत सुजन आर. चिनॉय आहेत, ज्यांनी ३ जानेवारी २०१९ रोजी तीन वर्षांच्या नियुक्तीवर MP-IDSA ची सूत्रे हाती घेतली. MP-IDSA ही भारतातील एकमेव थिंक-टँक आहे जिच्या महासंचालकांची नियुक्ती भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीद्वारे केली जाते.

MPIDSA ही बऱ्याच काळापासून भारतातील सर्वात प्रभावशाली थिंक-टँक पैकी एक मानली जाते. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या 'ग्लोबल गो टू थिंक टँक इंडेक्स' ने २०१७ मध्ये IDSA ला जगात ४१ वे स्थान दिले होते. भारतीय थिंक टँक्समध्ये या संस्थेला प्रथम स्थान मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →