मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म : १३ डिसेंबर १९५५; - १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.
त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत.
ते १९९४,१९९९,२००२,२००७ आणि २०१२च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले.
पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मनोहर पर्रीकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.