मनोज पहवा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मनोज पहवा

मनोज पहवा (जन्म: ८ डिसेंबर १९६३), हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे जो ऑफिस ऑफिस (२००१) या विनोदी मालिकेत भाटियाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. पहवा यांनी ७० हून अधिक चित्रपटांमध्ये पात्र अभिनेता म्हणून काम केले आहे, ज्यात ७½ फेरे (२००५), बीइंग सायरस (२००५), सिंघ इज किंग (२००८), दबंग २ (२०१२), जॉली एलएलबी (२०१३), दिल धडकने दो (२०१५), मुल्क (२०१८) आणि आर्टिकल १५ (२०१९) यांचा समावेश आहे. मुक्ल आणि आर्टिकल १५ साठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्काराचे नामांकन मिळाले.

त्यांनी अभिनेत्री सीमा भार्गव / पहवाशी लग्न केले आहे, जी टीव्ही मालिका हम लोग मधील त्यांची सह-अभिनेत्री होती. २ मार्च २०२२ रोजी, त्यांचा मुलगा मयंक पहवाने सनाह कपूरशी लग्न केले तर सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांची मुलगी मनुकृती पहवाने रुहान कपूरशी लग्न केले. सनाह व रुहान हे अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक कपूर यांची मुले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →