मनु म्हणजे मनुष्यजातीचा पहिला पूर्वज किंवा पहिला मनुष्य असे ऋगवेदात व अन्य वेदांमध्ये म्हटले आहे. म्हणूनच मानव, मनुष्य, मनुज असे मनुष्यवाचक शब्द संस्कृत व अन्य भारतीय भाषांमध्ये रूढ आहे.
वैदिक साहित्यात विवस्वत किंवा विवस्वान याचा पुत्र म्हणून वैवस्वत असे मनुचे विशेषण निर्दिष्ट केलेले आढळते. वैदिक साहित्यात मरणशील मनुष्यांमधील पहिला मनुष्य म्हणून हा मनुचा उल्लेख आहे.
यजुर्वैदाच्या शतपथ ब्राम्हणामध्ये मनु-वैवस्वत हा मनुष्यांच्या पहिला राजा आणि त्याचाच सख्खा भाऊ यमवैवस्वत हा मृतांचा म्हणजे पितरांचा पहिला राजा म्हणून वर्णिलेला आहे. (ऋगवेद -८.५२.१ शतपथ ब्राम्हण-१३.४.३) मनू हा यज्ञसंस्थेचा पहिला प्रवर्तक आणि सगळ्या माणसांना प्रकाश मिळावा म्हणून अग्नीची स्थापना करणारा पहिला मनुष्य असे ऋग्वेदामध्ये सांगितले आहे . (ऋग्वेद – १.३६.७६).
पौराणिक कालगणनेप्रमाणे सृष्टीनिर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंतच्या कालाचे विभाग १४ विभागांना मन्वंतर अशी संज्ञा दिली आहे. एकेका मन्वंतराची कालमर्यादा ४३ लाख २० हजार वर्ष इतकी मानलेली आहे.
मनु
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.