तनु वेड्स मनु रिटर्न्स हा २०१५ चा भारतीय रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो आनंद एल. राय दिग्दर्शित आहे आणि २०११ च्या तनु वेड्स मनु चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. आर. माधवन, कंगना राणावत, जिमी शेरगिल, दीपक डोबरियाल, स्वरा भास्कर आणि एजाज खान यांनी मूळ चित्रपटातून त्यांच्या भूमिका पुन्हा साकारल्या आहेत. या चित्रपटामध्ये राणावत एका हरियाणवी खेळाडूची अतिरिक्त भूमिका साकारत आहे. कथा, पटकथा आणि संवाद हिमांशू शर्मा यांनी लिहिले आहेत. कृष्णा सोलो यांनी संगीतबद्ध केले होते आणि गीते राजशेखर यांनी लिहिली होती. सरोज खान आणि बॉस्को-सीझर हे चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक होते तर संकलन हेमल कोठारी यांनी केले होते.
मुख्य छायाचित्रण ऑक्टोबर २०१४ मध्ये सुरू झाले आणि हा चित्रपट २२ मे २०१५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात या जोडप्याच्या आयुष्यातील पुढचा अध्याय दाखवून कथा पुढे नेण्यात आली आहे.
३९ कोटी (US$८.६६ दशलक्ष) बजेटमध्ये बनवलेले ह्या चित्रपटाने एकूण २५५.३ कोटी (US$५६.६८ दशलक्ष) कमावले. जागतिक स्तरावर आणि २०१५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी हा एक बनला. हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय फ्रँचायझींपैकी एक आहे.
तनु वेड्स मनु रिटर्न्सला समीक्षकांची प्रशंसा मिळाली, विशेषतः राणावतच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली, अनेकांनी तो आतापर्यंतच्या सर्वोत्तम बॉलीवूड सिक्वेलपैकी एक मानला आहे. या चित्रपटाला ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ३ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (राणावत) यांचा समावेश आहे. ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, त्याला ३ पुरस्कार मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) (रणावत) यांचा समावेश होता. फिल्म कंपॅनियनने या वेबसाइटने चित्रपटातील राणावतच्या अभिनयाची २०१० च्या दशकातील १०० सर्वोत्तम कामगिरीमध्ये गणना केली आहे.
तनू वेड्स मनू रिटर्न्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.