मध्य दिल्ली (सेंट्रल दिल्ली) हा भारतातील राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीच्या ११ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा पूर्वेला यमुना नदीने आणि उत्तरेला उत्तर दिल्ली, पश्चिमेला पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिणेला नवी दिल्ली या जिल्ह्यांनी वेढलेली आहे. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा सिव्हिल लाइन्स, करोल बाग आणि कोतवाली, दिल्ली या तीन उपविभागांमध्ये विभागलेला आहे.
मुघल साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण जुनी दिल्ली (शहाजहानाबाद) ह्याच जिल्ह्यात आहे. तसेच जामा मशीद ही दिल्लीमधील सर्वात मोठी मशीद व लाल किल्ला ह्याच जिल्ह्यात आहे.
मध्य दिल्ली जिल्हा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.