मधमाश्यांचे पोळे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मधमाश्यांचे पोळे

मधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्याआल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.

मधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्याआधीच पोळे बांधून तयार ठेवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →