मद्रास कॅफे (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मद्रास कॅफे हा २०१३ चा हिंदी भाषेतील राजकीय अ‍ॅक्शन थरार चित्रपट आहे जो शूजित सरकार दिग्दर्शित आहे आणि जॉन अब्राहम आणि रॉनी लाहिरी यांनी जेए एंटरटेनमेंट आणि रायझिंग सन फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित केला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, नर्गिस फखरी आणि राशी खन्ना (तिचा पहिला चित्रपट) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीलंकेतील गृहयुद्धात भारताच्या हस्तक्षेपाच्या आणि भारतीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या काळात घडतो. ह्या चित्रपटाचे कथानक एका भारतीय सैनिकाभोवती फिरते ज्याला गुप्तचर संस्था संशोधन आणि विश्लेषण विभागाने नियुक्त केले आहे कारण जाफनामध्ये काही घडमोडींनी भारतीय शांती सेनेला माघार घेण्यास भाग पाडले आहे.

२३ ऑगस्ट २०१३ रोजी मद्रास कॅफे प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरीपेक्षा जास्त कमाई करणारा ठरला. ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये निहार रंजन सामल आणि विश्वदीप चॅटर्जी यांना सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कमलजीत नेगी यांना फिल्मफेर सर्वोत्तम छायाचित्रण पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →