एस. कृष्णमूर्ती तथा मदन बॉब (९ ऑक्टोबर, १९५३;चेन्नई - २ ऑगस्ट, २०२५; चेन्नई) हे एक भारतीय अभिनेता आणि विनोदी कलाकार होते. त्यांनी प्रामुख्याने तमिळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये काम केले. याच सोबत त्यांनी मल्याळम, तेलुगू सह हिंदी चित्रपटात देखील विविध भूमिका साकारल्या. मदन बॉब त्यांच्या चेहऱ्यावरील मनोरंजक हावभाव, विनोदी भूमिका आणि बाहेर आलेल्या टपोर डोळ्यांसाठी ओळखले जात होते, ज्याची प्रेरणा त्यांनी काका राधाकृष्णन यांच्याकडून घेतली होती. याशिवाय ते सन टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो असथा पोवाथु यारू? मध्ये ज्युरी म्हणून दिसले होते.
त्यांना कर्करोग झाला होता आणि उपचार घेतल्यानंतर ते बरे झाल्याचे सांगण्यात आले, परंतु ०२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाले.
मदन बॉब
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.