मथु सावंत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डॉ. मथु सावंत (जन्म : कंधार, जि. नांदेड, १५ ऑगस्ट १९६६) या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे आजवर (सप्टेंबर २०१२) चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. ’तिची वाट वेगळी' हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या ३३ टक्‍के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे.

बीड येथे झालेल्या चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →