मणिबेन पटेल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मणिबेन पटेल

मणिबेन पटेल (३ एप्रिल १९०३ - २६ मार्च १९९०) या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्या आणि भारतीय संसदेच्या सदस्य होत्या. त्या स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या होत्या. मुंबईत शिकलेल्या पटेल यांनी १९१८ मध्ये महात्मा गांधींच्या शिकवणीचा अवलंब केला आणि अहमदाबादमधील त्यांच्या आश्रमात नियमितपणे काम करण्यास सुरुवात केली. १९२३-२४ मध्ये त्यांनी बोरसाड सत्याग्रहात भाग घेतला व १९२८ मध्ये बारडोली सत्याग्रहात पण त्या सामील झाल्या. १९३० च्या दशकात त्या असहकार चळवळ आणि दांडी सत्याग्रहात कार्यरत होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →