मकरंद टिल्लू हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ या नावाने ताणताणावाच्या जीवनात आवश्यक अशा विचारसरणीचा कार्यक्रम सादर करतात. तीन पिढ्यांना एकत्र घेऊन ‘हास्यपंचमी ते हास्यपासष्ठी’ असा कार्यक्रम ते सादर करीत. टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्या ६४ हुन अधिक वर्षे एकपात्री करतात.
टिल्लू यांनी दूरदर्शन, ई टीव्ही, आकाशवाणी यावर कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ४००० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. एकपात्री कलाकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते संयुक्त कार्यवाह होते. याच सोबत त्यांनी विविध व्याख्यानमालात, कॉलेजमध्ये सुमारे १०००हून व्याख्याने दिली आहेत. ७०० हून अधिक व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतल्या आहेत. मर्सिडीज बेंज, टाटा मोटर्स, महिंद्रा, सीएट, फियाट, टेक महिंद्रा, इन्फोसिस, केपीआयटी, थरमॅक्स, सानोफी, शाफलर, ग्रोवेल, भेल, लिनामार अशा अनेक कंपन्यात कार्यशाळा घेतल्या आहेत. यशदा, पोलीस डिपार्टमेंट, आर्मी, बँक अशा अनेक ठिकाणी देखील कार्यशाळा घेतल्या आहेत.
एकपात्री कलाकार परिषद, लाफ्टरयोगा इंटरनॅशनल, नवचैतन्य हास्ययोग परिवार,जलरक्षक प्रबोधिनी, हसायदान फौंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, वनराई, वसुंधरा स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक संस्थां सोबत कार्यरत आहेत.
मकरंद टिल्लू
थोडक्यात पण महत्त्वाचे.