भाषा संचालनालय हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारीतील एक कार्यालय असून राज्याच्या राजभाषा मराठी विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम करते. सन २०१०मध्ये स्थापन झालेल्या भाषा विभागाच्या नियंत्रणाधीन सध्या हे कार्यालय असून या कार्यालयाने आजपर्यंत मराठी भाषेबाबत मोलाची भूमिका पार पाडली आहे. शासकीय कामकाजात मराठीचा वापर होण्यासाठी प्रथम पदनाम कोश प्रकाशित करण्यात आला, जेणेकरून सर्व शासकीय पदनामे मराठीमध्ये यावीत. आज आपल्याला शासकीय पदनामे मराठीत दिसतात.
त्यानंतर प्रशासन वाक्प्रयोग, कार्यदर्शिका ही प्रकाशने तर शासकीय पत्रव्यवहार, टिपण्या,इ. सुटसुटीत भाषेत असाव्यात म्हणून `प्रशासनिक लेखन' हे पुस्तक प्रसिद्ध झाल. दुसरा टप्पा म्हणजे विद्यापीठांमधून शिक्षणाचे माध्यम मराठी असावे याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोशतयार झाले. त्यांत आता भर घालण्याचे काम वेगात सुरू आहे आणि तिसरा टप्पा न्यायालयात मराठी भाषेचा वापर होण्यासाठी न्याय व्यवहार कोश प्रकाशित करण्यात आला आहे.
भाषा संचालनालय
या विषयातील रहस्ये उलगडा.