भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकेल.
१८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत. एसबीआय अनिवासी भारतीयांना (एनआरआय) भारतातील आणि भारताबाहेरील शाखांच्या नेटवर्कमधून बँकिंग सेवा पुरवते. एसबीआयच्या भारतात १४ प्रादेशिक hubs असून देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ५७ विभागीय कार्यालये आहेत. एसबीआयचा भारतीय व्यापारी बँकांमध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात २०% हिस्सा आहे.
भारतीय स्टेट बँक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.