श्रीअरविंद लिखित 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या ग्रंथाचा मराठी अनुवाद 'भारतीय संस्कृतीचा पाया' या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. या विषयावरील लेख आधी 'आर्य' मासिकात १५ डिसेंबर १९१८ ते १५ जानेवारी १९२१ या कालावधीत सदर रूपाने प्रकाशित करण्यात आले होते. नंतर श्रीअरविंद यांनी त्यावर परिष्करण केले आणि मग सुधारित आवृत्ती 'द फाउंडेशन्स ऑफ इंडियन कल्चर' या नावाने १९५३ साली न्यू यॉर्क येथे प्रकाशित करण्यात आली. त्याची भारतीय आवृत्ती १९५९ साली प्रकाशित झाली. सेनापती पां.म.बापट यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय संस्कृतीचा पाया (ग्रंथ)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!