भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे) (इंग्रजी: Indian Institute of Science Education and Research, Pune) (किंवा आयसर पुणे) ही पुणे, महाराष्ट्र येथील भारतातील एक स्वायत्त उच्च शिक्षण संस्था आहे. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या शिफारसीवरून भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालया अंतर्गत पाच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थांची स्थापना केली. आयसर पुणे त्यापैकी एक आहे. आयसर पुणेची स्थापना २००६ साली झाली. २०१२ साली संसदेतील कायद्यानुसार आयसर पुणेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था घोषित करण्यात आले.
आयसर पुणेचा कॅम्पस ९८ एकरात पसरला असून तो पुण्यातील पाषाण येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या शेजारी आहे. डॉ. सुनील भागवत हे आयसरचे संचालक आहेत.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!