भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (इंग्रजी : Indian Institutes of Science Education and Research संक्षेप: आय. आय. एस. ई. आर.) हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत नैसर्गिक विज्ञान शिकवण्यासाठी आणि संशोधनासाठी आणि पदवीपूर्व स्तरावर संशोधनासह एकत्रित मूलभूत विज्ञानांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या स्वायत्त संस्थांचा समूह आहे.

भारताच्या संसदेने विज्ञान शिक्षण आणि संशोधन (सुधारणा) कायदा, २०१० द्वारे या संस्थांची औपचारिक स्थापना केली. महाराष्ट्रात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे), मध्य प्रदेशातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (भोपाळ), पंजाबमधील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (मोहाली), पश्चिम बंगालमधील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (कोलकाता), केरळमधील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (तिरुवनंतपुरम), आंध्र प्रदेशातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (तिरुपती) आणि ओडिशातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (ब्रह्मपूर) अशा सात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था देशभरात स्थापन करण्यात आली आहेत. या संस्थांना भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर सारख्या संस्थांसह मूलभूत विज्ञान क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, २०१२ मध्ये भारतीय संसदेने सर्व भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थाला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून घोषित केले. प्रत्येक भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेकरिता स्थापनेच्या पहिल्या पाच वर्षांसाठी आर्थिक परिव्यय सुमारे ५०० कोटी (US$१११ दशलक्ष)आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →