भारतीय रुपयाचे चिन्ह () हे भारतीय रुपयाचे अधिकृत चलन चिन्ह आहे. १५ जुलै २०१० रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आले. हे चिन्ह वापरत येण्यापूर्वी सामान्यत: "Rs" किंवा "Re" या चिन्हांचा वापर होत असे किंवा जर मजकूर इतर भारतीय भाषांमध्ये असल्यास त्या भाषेतील साजेसे संक्षिप्त रूप वापरले जात असे. हे चिन्ह भारतीय चलना पुरतेच मर्यादित असून नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका या देशांप्रमाणेच इतर देश जेथे रुपया हे चलन म्हणून वापरत आहे तेथे आजही "Rs" याच चिन्हाचा वापर केला जातो.
हे चिन्ह देवनागरी लिपीतील "र" आणि लॅटिन लिपीतील "R" या अक्षरांना ध्यानात ठेवून बनविण्यात आले आहे.
भारतीय रुपयाचे चिन्ह
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.