भारतीय पारपत्र (पासपोर्ट) हे भारताच्या राष्ट्रपतींनी भारताच्या नागरिकांच्या परदेशगमनासाठी दिलेला परवाना आहे. पासपोर्टधारक भारतीय पासपोर्ट ॲक्ट (१९६७) नुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर भ्रमण करणास सक्षम असतो. मात्र हा परवाना बाळगणाऱ्याला परकीय देशात प्रवेश मिळण्यासाठी त्या देशाने दिलेला 'व्हिसा' असणे आवश्यक असते. नेपाळ, भूतान आणि बाली या काही देशांत प्रवेश करण्यासाठी व्हिसा लागत नाही.
काही देशात आपण व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा आॅन अरायव्हल’वर जाऊ शकतो.
उदा. अंटार्क्टिका, बोलिव्हिया, ब्रिटिश व्हर्जिन आइसलॅण्ड, कंबोडिया, कूक आइसलॅण्ड, फिजी, ग्रेनाडा, वानूआतू, तुर्क अॅण्ड काइकोस आइसलॅण्ड, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, मकाऊ, माइक्रोनेसिया, नेपाळ, सेंट व्हिन्सेंट अॅण्ड ग्रेनाडीन्स, मॉरिशस, सेंट किट्स अॅण्ड नेव्हिस, जॉर्डन, हॉंगकॉंग.
भारतीय पारपत्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!