भारताच्या टी२० क्रिकेट खेळाडूंची यादी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भारताच्या टी२० क्रिकेट खेळाडूंची यादी

आंतरराष्ट्रीय टी२० (T20I) हा दोन प्रातिनिधिक संघांमधील क्रिकेट सामन्याचा एक प्रकार आहे, प्रत्येक संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ठरवल्यानुसार आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा आहे, आणि सामना ट्वेंटी-२० क्रिकेटच्या नियमांनुसार खेळला जातो. असा पहिला सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या संघांदरम्यान खेळला गेला. भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेतील २००६-०७ मालिकेदरम्यान वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला; भारताने यजमानांचा एकमेव सामन्यात सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका जिंकली.

जुलै २०२४ पर्यंत, ११५ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताने पहिल्या आयसीसी विश्व ट्वेंटी-२० च्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →