भारताचे अर्थमंत्री

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारताचे अर्थमंत्री

भारताचा अर्थमंत्री (भारताचा वित्तमंत्री) हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री व भारतीय अर्थमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला अर्थमंत्री हा भारत देशाची आर्थिक व वित्तीय धोरणे ठरवण्यासाठी व देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जबाबदार आहे.

अर्थमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →