भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →