महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातीत अनेक समुद्र किनारे आहेत. त्यातील एक म्हणजे रत्नागिरी शहराच्या जवळच असणारा समुद्रकिनारा,"भाट्ये समुद्रकिनारा" हा एक प्रसिद्ध किनारा आहे.या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते .समुद्र किनारी असणारे सुरू झाडांचे वन आहे.किनाऱ्या जवळच असणाऱ्या झरी विनायक ठिकाणी किनाऱ्यानजीक झरी विनायकाचे सुंदर मंदिर आहे.किनाऱ्या जवळच समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तेथेच भाट्येची खाडी तयार होते.ह्याठिकाणी देशातून व राज्यातून खूप पर्यटक आकर्षित होतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भाट्ये समुद्रकिनारा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.