भागोजी कीर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भागोजी बाळूजी कीर (०४ मार्च १८६७ - २४ फेब्रुवारी, १९४१ ) हे मुंबईतील एक बांधकाम व्यावसायिक होते. ते भंडारी समाजातील नेते समजले जातात.

भागोजीशेठ कीर यांचा जन्म ०४ मार्च १८६७ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे बालपण दारिद्र्यात आणि रत्‍नागिरीच्या रत्‍नदुर्ग किल्ल्यावरच्या एका झोपडीत राहून गेले. ज्या वयात खेळायचे त्या वयात सोनचाफ्याची फुले आणि उंडणीच्या बिया विकून घरासाठी ते दोन-चार आणे मिळवत. त्यांची आई लक्ष्मीबाई अतिशय धार्मिक आणि सात्त्विक वृत्तीची होती. वडील बाळूजी शेतमजूर होते. भागोजीशेठ कीर यांनी त्या वेळी मोफत शिक्षण मिळत असलेल्या एका सरकारी शाळेत प्रवेश मिळवला, आणि वयाच्या १२व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →