भरत जाधव

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भरत जाधव

भरत जाधव (१२ डिसेंबर १९७३) हा एक भारतीय अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मूळचा कोल्हापूरचे असला तरी त्याचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मुंबईत स्थायिक झाले होते. भरतचे बालपण लालबाग परळ येथील राजाराम स्टुडिओच्या अंगणात गेले.

३००० प्रयोग करणाऱ्या ऑल द बेस्ट या मराठी रंगभूमीवरील नाटकात अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर यांच्यासोबत अभिनय करताना भरत जाधव प्रसिद्ध झाला. त्यांने नंतर 'सही रे सही' या अतिशय गाजलेल्या मराठी नाटकात काम केले. जत्रा चित्रपटातील कोंबडी पळाली या गाण्यातील त्याच्या अभिनयाची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. जाधव यांनी २०१३ मध्ये भरत जाधव एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली.

भरतने ८५ पेक्षा जास्त चित्रपट आणि ८ मालिका केल्या आहेत. ८५०० पेक्षा जास्त नाटकांच्या प्रयोगांत काम केले आहे. सही रे सही या एकाच नाटकात भरत जाधवने चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले. हे नाटक गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →