भद्र मारुती

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भद्र मारुती

भद्रा मारुती मंदिर हे पवित्र स्थळ , श्रीरामभक्त श्रीहनुमानांचे प्राचीन मंदिर आहे. हे पवित्र स्थळ महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद येथे स्थित आहे. तसेच हे पवित्र प्राचीन मंदिर, वेरुळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व लेण्यांपासून जवळच काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

हे प्राचीन मंदिर हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील भद्रा मारूती नवसाला पावणारा असून , हे अत्यंत जागृत असे पवित्र मंदिर आहे.

येथील श्रीहनुमानांची मूर्ती शयनावस्थेत /निद्रावस्थेत आहे. शयनावस्थेत/ निद्रावस्थेत असलेल्या श्रीहनुमानांची अजून दोन ठिकाण भारतात आहे. ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर व आणि मध्य प्रदेशातील जाम सावली येथे आहे. भद्रा मारुती मंदिर हे श्री, हनुमानजी यांच्या भक्तांसह, श्रीरामजी आणि देवाधिदेव महादेवजी यांच्या भक्तांचे देखील आकर्षण मानले जाते.

हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि राम नवमी अशा शुभ प्रसंगी भद्रा मारुती मंदिर येथे श्रीहनुमानांची आणि श्रीरामांची , भक्ती करणारे लाखोंच्या संख्येने भक्त /भाविक , दर्शनासाठी या पवित्र मंदिरात येतात.

त्याचप्रमाणे भारत देशासह महाराष्ट्र राज्यात श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला खूप महत्त्व असते. तसेच श्रीहनुमानजी हे महादेवांचे रूप असल्याने , शनिवारी शिवभक्त देखील लाखोंच्या संख्येने, दर्शनासाठी भद्रा मारुतींच्या दर्शनाला येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →