भक्ती योग किंवा भक्ती मार्ग (शब्दशः भक्तीचा मार्ग), हिंदू धर्मातील एक आध्यात्मिक मार्ग किंवा किंवा आध्यात्मिक साधनेचा एक प्रकार ज्यामध्ये आपल्या आवडत्या किंवा इष्टदेवतेला प्रेमभावाने पूजिले जाते. ज्ञान योग आणि कर्म योग याबरोबरच हिंदूंच्या आध्यात्मिक साधनांमधील हा एक मार्ग आहे. ही परंपरा अत्यंत प्राचीन आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये भक्तीची व्याख्या सहभाग, समर्पण आणि कोणत्याही प्रयत्नामध्ये असलेली आत्मीयता अशी केली गेली आहे. मोक्ष मिळविण्यासाठी सांगितल्या गेलेल्या तीन आध्यात्मिक मार्गांपैकी एक म्हणून भक्ती योगाची भगवद्गीतेमध्ये सखोल चर्चा केली गेली आहे.
भक्त म्हणून आपल्या इष्टदेवतेच्या बाबतीत प्रत्येकाची वैय्यक्तिक आवड निरनिराळी असू शकते. यामध्ये गणेश, कृष्ण, राधा, राम, सीता, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, शिव, पार्वती, दुर्गा यासारख्या देवतांचा समावेश असू शकतो.
दक्षिण भारतातील तामिळनाडू येथे अंदाजे ख्रिस्ताब्द १००० च्या मध्यापासून सुरू झालेला आणि या देवतांचा समावेश असलेला हा भक्तीमार्ग भक्ती चळवळीमुळे आणखी वाढला. या चळवळीचे नेतृत्व शैव नयनार आणि वैष्णव आळवार संत यांनी केले. त्यांच्या संकल्पना व साधनेमुळे १२व्या ते १८व्या शतकात संपूर्ण भारतात भक्ती काव्य आणि भक्ती यांना प्रेरणा मिळाली. वैष्णव पंथ, शैव पंथ आणि शाक्त पंथ या मार्गातील धार्मिक साधनेचा भक्ती मार्ग हा एक भाग आहे.
भक्ती योग
थोडक्यात पण महत्त्वाचे.