ब्रॅडली चार्ल्स कूपर (५ जानेवारी १९७५) हा एक अमेरिकन अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि दोन ग्रॅमी पुरस्कारांचा तो प्राप्तकर्ता आहे. याव्यतिरिक्त त्याला नऊ अकादमी पुरस्कार, सहा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स, आणि टोनी अवॉर्ड्ससाठी नामांकने आतापर्यंत मिळाली आहेत.
कूपरला तीन वेळा फोर्ब्स सेलिब्रिटी १०० यादीमध्ये समाविष्ट केले गेले. तो २०१५ मध्ये जगातील १०० सर्वात प्रभावशाली लोकांच्या टाईमच्या यादीत होता. त्याच्या चित्रपटांनी ११ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या वार्षिक क्रमवारीत आतापर्यंत तो चार वेळा होता.
कूपरने १९९९ मध्ये टेलीव्हिजन मालिका सेक्स अँड द सिटीमध्ये पाहुण्याच्या भूमिकेसह कारकिर्दीची सुरुवात केली. २००० मध्ये अॅक्टर्स स्टुडिओमध्ये एमएफए अभ्यासक्रमात त्याने प्रवेश घेतला. विनोदी चित्रपट वेट हॉट अमेरिकन समर (२००१) मधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि दूरदर्शन मालिका आलियास (२००१-०६) मध्ये विल टिपिन म्हणून तो प्रसिद्धीस आला. २०११ आणि २०१३ मधील दोन भागांच्या द हँगओव्हर (२००९) मध्ये त्याने यश मिळवले. लिमिटलेस (२०११) आणि द प्लेस बियॉन्ड द पाइन्स (२०१२) मधील मुख्य भूमिकांसह त्याने प्रगती केली.
कूपरला प्रणय विनोदपट सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक (२०१२), ब्लॅक कॉमेडी अमेरिकन हसल (२०१३), आणि युद्धपट अमेरिकन स्निपर (२०१४) मध्ये अधिक यश मिळाले, ज्याची त्याने निर्मिती देखील केली होती. या चित्रपटांमधील त्याच्या कामासाठी त्याला चार अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. २०१४ मध्ये त्याने द एलिफंट मॅनच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनात जोसेफ मेरिकची भूमिका साकारली. या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या टोनी पुरस्कारासाठी तला नामांकन मिळाले. पुढे त्याने मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये रॉकेट या भूमिकेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. २०१८ मध्ये कूपरने ए स्टार इज बॉर्न या संगीतमय प्रणयपटाच्या रिमेकची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय केला. यूएस बिलबोर्ड २०० नंबर वन साउंडट्रॅक आणि त्याच्या चार्ट-टॉपिंग लीड सिंगल "शॅलो" मधील योगदानासाठी त्याने चित्रपटासाठी तीन ऑस्कर नामांकने, तसेच बाफ्टा पुरस्कार आणि दोन ग्रॅमी पुरस्कार मिळवले. जोकर (२०१९) आणि नाईटमेअर अॅली (२०२१) या मानसशास्त्रीय थरारपटांच्या निर्मितीसाठी त्याला पुढील अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले.
माध्यमांद्वारे प्रणय प्रतीक म्हणून घोषित केलेल्या कूपरला २०११ मध्ये पीपल मॅगझिनच्या "सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह" म्हणून नाव देण्यात आले. कर्करोगाशी लढायला मदत करणाऱ्या अनेक धर्मादाय संस्थांना तो पाठिंबा देतो. कूपरने अभिनेत्री जेनिफर एस्पोसिटोशी लग्न केले होते आणि मॉडेल इरिना शेकसोबतच्या नातेसंबंधातून त्याला एक मुलगी आहे.
ब्रॅडली कूपर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.