ब्रिगिड जेप्शेशिर कोस्गेई (२० फेब्रुवारी, १९९४ - ) या केन्याच्या मॅरेथॉन धावपटू आहेत. त्यांनी २०१८ आणि २०१८ मध्ये शिकागो मॅरेथॉन आणि २०१९ ची लंडन मॅरेथॉन जिंकली होती. त्या २०१७ची शिकागो मॅरेथॉन आणि २०१८च्या लंडन मॅरेथॉनमध्ये द्वितीय क्रमांकावर आल्या होत्या. सध्याच्या मॅरेथॉन विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी शिकागो येथील १३ ऑक्टोबर २०१९ रोजी झालेली मॅरेथॉन २:१४:०४ तासात पूर्ण करून विश्वविक्रम मोडला. हा विक्रम १६ वर्षांपासून अबाधित होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिगिड कोस्गेई
थोडक्यात पण महत्त्वाचे.