ब्राझिलचा पहिला पेद्रो (पोर्तुगीज: Pedro I) (ऑक्टोबर १२, इ.स. १७९८ - सप्टेंबर २४, इ.स. १८३४ हा ब्राझिलचा सम्राट होता.
पेद्रोने ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वतंत्र जाहीर केले व स्वतःला तेथील सम्राट घोषित केले. याआधी पेद्रो अल्पकाळाकरता चौथा पेद्रो या नावाने पोर्तुगालचा राजा होता.
याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कांतारा फ्रांसिस्को ॲंतोनियो होआव कार्लोस हाविये दि पॉला मिगेल रफायेल होआकिम होजे गॉन्झागा पास्कोल सिप्रियानो सेराफिम दि ब्रागांसा इ बर्बन असे होते. याला दॉम पेद्रो प्रायमेरो या नावानेही ओळखतात.
ब्राझिलचा पहिला पेद्रो
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?