भारतातील तमिळनाडू राज्यांत तिरुचिरापल्लीजवळील तिरुप्पट्टूर नामक छोट्या गावातले हे ब्रह्मपुरीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. ह्या स्थळी येऊन ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त केल्यास भाविकांचे विधिलिखित बदलून मंगलकारी होते असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. भारतात ब्रह्मदेवाचे एकच मंदिर असल्याच्या सर्वसाधारण मान्यतेस छेद देणाऱ्या मंदिरांपैकी हे एक असून, ब्रह्मदेवाची अशी इतरही अनेक मंदिरे दक्षिणी भारतात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रह्मपुरीश्वर मंदिर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.