ब्रह्मदेव (किंवा ब्रह्मा) (संस्कृत: ब्रह्मा, IAST: ब्रह्मा) हा हिंदू धर्मामध्ये, सृष्टीचा निर्माण कर्ता आहे. ब्रह्मदेवाला स्वयंभू, वागीश आणि चार वेदांचा निर्माता, चतुर्मुख, चतुरानन (त्याचा प्रत्येक मुखातून चार वेद निर्माण झाले) या नावांनी संबोधतात. देवी सरस्वती (विद्येची देवता) ही ब्रह्मदेवाची पत्नी आहे. तो मनु, संतकुमार, नारद मुनी, दक्ष, मरीचि ऋषि, अत्रि, पुलस्त्य, वशिष्ठ इ. यांचा पिता आहे. तो हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा देव आहे. तीन प्रमुख देवांपैकी (त्रिमूर्ति) ब्रह्मदेव एक आहे (विष्णू व महेश हे इतर दोन देव आहेत).
हिंदू पौराणिकथानुसार, ब्रह्मदेवाचा जन्म विश्वाच्या सुरुवातीला भगवान विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या एका कमळाच्या फुलातून झाला. ब्रह्मदेवाच्या प्रत्येक मुखातून चार वेद उत्पन्न झाले.
ब्रह्मदेव हा हिंदूंचा महत्त्वाचा देव असला तरी याची पूजा केली जात नाही. भारतात ब्रह्मदेवाचे एकुलते एक देऊळ राजस्थानातील पुष्कर तलाव येथे आहे.
हिंदू धर्माने सात लोक (जगे) कल्पिली आहेत. भूलोक (पृथ्वी), भुवर्लोक (पृथ्वी व सूर्य यांमधील जग), स्वर्लोक (सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचे जग), महर्लोक (सूर्य व नक्षत्रांचे जग), जनलोक (ब्रम्हदेवाच्या मानस पुत्रांचे जग),. तपोलोक (तपस्वी लोकांचे जग) आणि सत्यलोक (किंवा ब्रह्मलोक, ब्रह्मदेवाचे निवासस्थान).
माणसाचा मृत्यू झाला व त्याचा आत्मा अन्य कोठे गेला नाही तर ब्रह्मलोकाला जातो.
शतपथ ब्राह्मण ग्रंथानुसार , ब्रम्हदेवाच्या मानस पुत्रांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
वशिष्ठ
कश्यप
विश्वमित्र
जमदग्नि
महर्षिः गौतम
भारद्वाज
अत्रि
वायुपुराणात महर्षि भृगु आठव्या मानस पुत्र म्हणून जोडले गेले आहे.
ब्रह्मदेव
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.