अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे आठ ग्रह आपल्या सुर्यामालेभोवती आहेत पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो.
काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरू, शनी इ.) असतात.
सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रह ओळखला जातो. त्याचा आकार इतर ग्रहापेक्ष्या मोठा आहे.
सूर्य हा एक तारा आहे.
चंद्र स्वतः भोवती फिरत फिरत पृथ्वी भोवतीही प्रदक्षिणा करतो, यालाच "परिभ्रम्हण" म्हणतात.
स्वतः भोवती फिरणे म्हणजे परिवलन होय.
पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्या भोवतीही प्रदक्षिणा करते.म्हणून तर पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू येतात.
पृथ्वीचा परिवलन काळ 24 तासाचा असतो व परिभ्रमन काळ 365 दिवसाचा असतो.
दर चार वर्षांनी लीप वर्ष येते.
लीप वर्षातील फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो.
सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वी वर येण्यास 8 मिनिटे व 20 सेकंद लागतात.
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत.
सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश वस्तूला परग्रह म्हणतात.
ग्रह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.