बोरमाळ हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. हा दागिना सोने या धातू पासून तयार होतो. यामध्ये सोन्याचे मणी असतात. ते मणी लंबगोल आकाराचे असतात व ते एका धाग्यामध्ये गुंंफले जातात.लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणजे बोरमाळ. बोरमाळ बनवायला खूप जास्त सोनं लागत नाही. पातळ पत्र्याचे मणी बनवून आत लाख भरली जाते. त्यामुळे कमी सोन्यात मजबूत दागिना तयार होतो.
गोल मण्यांसोबतच लांबट चौकोनी मण्यांचीहि बोरमाळ बनवली जाते. पूर्वी घालायच्या. पण आता दोनपदरी आणि तीनपदरी बोरमाळांचीही खास चलती आहे.
बोरमाळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.