रुदरफोर्ड-बोर प्रतिकृती किंवा बोर प्रतिकृती ही अणूची अंतर्गत रचना स्पष्ट करणारी अणुभौतिकीमधील एक प्रतिकृती आहे. १९१३ मध्ये नील्स बोर यांनी अर्नेस्ट रुदरफोर्डच्या संकल्पनेवर ही प्रतिकृती मांडली. या प्रतिकृतीनुसार प्रत्येक अणुमध्ये धन विद्युतप्रभार असणारे अणुकेंद्रक असते आणि या अणुकेंद्रकाभोवती ऋण विद्युतप्रभार असणारे इलेक्ट्रॉन वर्तुळाकार रेषेत फिरत असतात. अणुकेंद्रक हे धन विद्युतप्रभार असणारे प्रोटॉन आणि कोणताही विद्युतभार नसणारे न्युट्रॉन यांनी बनलेले असते. अणूची ही प्रतिकृती आपल्या सौरमालेसारखीच आहे. अणुकेंद्रक हे सूर्यासारखे तर त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन ग्रहांसारखे आहेत आणि गुरुत्वाकर्षणाएवजी येथे विद्युतचुंबकीय बल कार्यरत असते. रुदरफोर्डची अणूची मूळची प्रतिकृती आणि ही प्रतिकृती यांतील प्रमुख फरक म्हणजे स्थिर कक्षांची संकल्पना. बोर यांनी इलेक्ट्रॉनची अणूमधील हालचाल ही मर्यादित असते असे सुचवले व त्यासाठीचे काटेकोर गणितीय नियम वापरून रुदरफोर्डच्या प्रतिकृतीमध्ये बदल केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोरची अणूची प्रतिकृती
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.