बोगनव्हिल मोहीम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बोगनव्हिल मोहीम

बोगनव्हिल मोहीम तथा चेरी ब्लॉसम मोहीम दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रे व जपानी साम्राज्यामध्ये झालेल्या लढाया होत्या. १ नोव्हेंबर, इ.स. १९४३ ते २१ ऑगस्ट, इ.स. १९४५ दरम्यान चालू असलेली ही मोहीम कार्टव्हील मोहीम या दोस्त राष्ट्रांच्या जपानविरुद्धच्या प्रचंड मोहीमेचा भाग होती.

या मोहीमेच्या पूर्वार्धात अमेरिकन सैन्याने बोगनव्हिल द्वीपावर चढाई करून पुळणीवर ताबा मिळवला व नोव्हेंबर १९४३ ते नोव्हेंबर १९४४ तेथे ठाण मांडून ठेवले. या दरम्यान जपानी सैन्याची उपासमार आणि रोगराईमुळे मोठी खराबी झाली. उत्तरार्धात अमेरिकन सैन्य उरलेल्या जपानी सैनिकांना नामोहर करण्यासाठी बेटावर घुसले. येथे त्यांना जवळजवळ १० महिने कडवा प्रतिकार झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →