बेट

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बेट

बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या गटाला द्वीपसमूह असे म्हणले जाते.

जी बेटे जमिनीपासून जवळ आहेत त्यांना खंडीय बेटे तर जी दूर आहेत त्यांना महासागरी बेटे असे संबोधले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →