बॅरी युजीन "बुच" विल्मोर (जन्म: २९ डिसेंबर, १९६२) हे एक अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकेचे नौदलातील चाचणी वैमानिक (टेस्ट पायलट) आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन अंतराळ मोहिमा केल्या आहेत. त्यांची पहिली मोहीम STS-129 ही २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ११ दिवसांची होती. त्यानंतर त्यांनी एक्सपेडिशन ४१ आणि एक्सपेडिशन ४२ मध्ये भाग घेतला. ५ जून २०२४ रोजी ते बोईंग क्रू फ्लाइट टेस्ट या बोईंग स्टारलाइनरच्या पहिल्या मानवयुक्त मोहिमेसाठी अंतराळात गेले. १८ मार्च २०२५ रोजी ते स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेसह पृथ्वीवर परतले. त्यांनी अंतराळात एकूण ४६४ दिवस, ८ तास आणि ३ मिनिटे घालवली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅरी विल्मोर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.