बॅनुवांगी रीजेंसी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बॅनुवांगी रीजेंसी

बॅनुवांगी रीजेंसी हे इंडोनेशियातील पूर्वी कडील जावा प्रांतातील एक प्रशासकीय (इंडोनेशियन: कबाबेटेन) भाग आहे. ही रीजेंसी जावा बेटाच्या पूर्वेकडील भागावर स्थित आहे. हे जावा आणि बाली दरम्यान बंदराचे कार्य करते. याच्या पश्चिमेला पर्वत व जंगलांनी आहेत आणि समुद्र पूर्वेला आणि दक्षिणेला आहे. बॅनुवांगी बालीपासून एका चिंचोळ्या भागाने विभागलेली आहे. याचे क्षेत्रफळ ५७८२.४ वर्ग किमी आहे, याचेमुळे ही रीजेंसी जावा मधील सर्वात मोठी आहे. २००० च्या जनगणनेनुसार याची लोकसंख्या १४,८८,७९१ होती. २०१० च्या जनगणनेनुसार ती १५,५६,०७८ पर्यंत वाढली होती. नवीनतम अधिकृत अंदाजा नुसार (जानेवारी २०१४ ला) याची लोकसंख्या १५,९९,७८८ आहे. बॅनुवांगी शहर ही प्रशासकीय राजधानी आहे. बॅनुवांगीचा जावानीज भाषेतील अर्थ "सुगंधित पाणी" असा आहे. तसेच हे नाव श्री तंजंगच्या जावातील लोककथाशी जोडलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →