बृहदेश्वर मंदिर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बृहदेश्वर मंदिर

बृहदेश्वर मंदिर (तमिळ - पेरुवुदैयार कोविल பெருவுடையார் கோயில்) तथा तंजई पेरिया कोविल हे तंजावर, तमिळनाडू मध्ये कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर स्थित भगवान शिवाला समर्पित द्रविड शैलीतील हिंदू मंदिर आहे. मंदिरास राजराजेश्वरम देखील म्हणले जाते. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. विकसित तमिळ वास्तुकलेचे हे अनुकरणीय उदाहरण आहे, मंदिरास दक्षिणेचा मेरू असेही म्हणतात. हे मंदिर चोळ राजा राजराजा पहिला याने इ.स. १००३ ते १०१० या दरम्यान बांधले. या मंदिरासोबतच चोळ वंशाच्या काळातील गंगाईकोंडा चोलापुरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर हे युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळाचा एक भाग आहे ज्याला "चोळ राजांची जिवंत भव्य मंदिरे (ग्रेट लिविंग चोला टेंपल्स)" म्हणून ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →