बी.के. गोयल

या विषयावर तज्ञ बना.

डॉ. बी.के. गोयल (इ.स. १९३६ - २० फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र) हे एक जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ होते. गोयल हे प्रख्यात व्यक्तींबरोबरच तसेच गरीब रुग्णांचेही उपचार करीत. ते शेवटपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता पदावर होते.

डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतच ते जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून काम करीत. अवघ्या २९व्या वर्षी जे. जे. रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →