बीइंग सायरस हा २००५ मध्ये प्रदर्शित झालेला होमी अडजाणिया दिग्दर्शित इंग्रजी भाषेतील भारतीय डार्क कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट एका मोडकळीस आलेल्या पारसी कुटुंबाभोवती फिरतो. हा चित्रपट होमी अदजानियाचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट आहे. प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट २००७ मध्ये हिंदी डब आवृत्तीत प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त होते, पण दिग्दर्शकाने ती योजना रद्द केली.
२००७ मध्ये झालेल्या ५२ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, बीइंग सायरसला ७ नामांकने मिळाली, सर्व तांत्रिक श्रेणींमध्ये. एकही पुरस्कार न जिंकणाऱ्या चित्रपटासाठी ही सर्वाधिक नामांकने होती. दुसऱ्या ग्लोबल इंडियन फिल्म पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला ३ नामांकने मिळाली.
बीइंग सायरस
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.