बिनय रंजन सेन (१ जानेवारी १८९८, दिब्रुगढ - १२ जून १९९३, कलकत्ता) एक भारतीय मुत्सद्दी आणि भारतीय नागरी सेवा अधिकारी होते. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक (१९५६-६७) म्हणून काम केले. त्यांनी १९४३ च्या बंगाल दुष्काळात मदत आयुक्त म्हणून काम केले, जो अनुभव त्यांच्या संयुक्त राष्ट्राच्या पदासाठी उपयोगी झाला.
त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. सेन १९२२ मध्ये बंगालमधील भारतीय नागरी सेवेत रुजू झाले.
१९७० मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले.
बिनय रंजन सेन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.