बा.भो. शास्त्री

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बाभुळगावकर भोजराज शास्त्री उर्फ बा.भो. शास्त्री हे मराठी कवी, लेखक आणि महानुभाव पंथातील प्रवचनकार महंत आहेत.

शास्त्री यांचा जन्म सन १९५२ मध्ये मु.पो. मांजरगाव ता.बदनापुर जि.जालना येथे सौ भागुबाई व श्री रंगनाथ पांडुरंग डाके यांच्या पोटी एका वारकरी कुटुंबात झाला, त्यांचे नाव भिकाजी असे ठेवण्यात आले. वडीलांच गावातच छोटंसं हॉटेल,आई बद्दल बाबांना देखील आठवत नाही कारण जन्मानंतर काही महिन्यात त्यांचे निधन झाले.आईच्या प्रेमाला मुकलेल्या व वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे सरभर झालेले जीवन यशोदा माई बनुन सावरलं ते त्यांच्या आत्यांनी. आपली आई आणि वडील कोण आहेत हे बाबाला माहिती नव्हतं;बाबा आत्याला च जन्मदात्री समजुन आई म्ह्णून हाक मारत. बाबांचे बालपण डोंगरगाव ता.बदनापुर जि.जालना येथे आत्याच्या घरी गेले. बालपण गुर-ढोर सांभाळन्यात डोंगरदऱ्या मध्ये फिरण्यात एका सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलाप्रमाणे गेले. तेथे शिक्षणाचा गंध लागेल असं वातावरण देखील बाबांना लाभलं नाही म्हणुन औपचारिक असं शालेय शिक्षण झालेले नाही.

शैक्षणिक वाटचाल -

१९६९ साली वयाच्या १७ व्या वर्षी महानुभाव आश्रम बदनापुर येथे बाबाना अक्षरांची ओळख झाली.

१९७४ साली फैजपूर जि.जळगाव येथील श्री चक्रधर संस्कृत महाविद्यालयात येथे संस्कृत अध्ययनासाठी प्रवेश

१९७८ साली नागपूर विद्यापीठाची शास्त्री परीक्षा उत्तीर्ण झाले.

वारकरी ते पंथीय -

वारकरी पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म यामुळे साहजिकच वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. बाबा अनेक प्रागतिक विचार, काळाबरोबर बदल स्वीकारण्याची त्यांची वृत्ती बाबा जपताना दिसतात. आपल्या वाटचालीत महानुभाव व वारकरी संप्रदायांमध्ये झालेल्या विचारसंघर्षांची नोंदही येते. ‘माझं माहेर वारकरी व सासर महानुभाव आहे. माहेर व सासरच्या संघर्षांत सापडलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली होती,’ अशी जाहीर कबुली बाबा देत असतात. वारकरी संतांविषयीची आदरभावना मनात असल्याने महानुभाव आणि वारकरी संप्रदाय यांची समन्वयाची भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसुन येते. पंथात कीर्तनपरंपरा रुळवण्याचा प्रयत्न शास्त्रीजींनी केला. महाचिंतनी सारख्या सर्वसमावेशकयंत्रणेचे जनक म्हणुन बाबा सर्वश्रुत आहेत.

चिंतनीजनक बा. भो. शास्त्री -

चिंतनी च्या व्यासपीठावरून सर्वधर्म-पंथ-जात एकच आहेत ही शिकवण दिली जाते.या ३ दिवसीय महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक, साहित्यिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण केले जाते. दरवर्षी जानेवारी मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो च्या संख्येने लोक उपस्थित असतात

पुरस्कार -



बाबांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यात हरी नारायण आपटे हा वाङ्ममय पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा २०२३ या वर्षासाठीचा ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते आळंदी येथे देण्यात आला.

बाबांची ग्रंथसंपदा -



बा. भो. शास्त्री यांची साहित्य संपदा बद्दल सांगायचे झाल्यास सुमारे ४० हुन अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत."झांजर" या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा हरी नारायण आपटे हा वाङ्ममय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

'निश्चल डोंगरगाव प्रेमळ माणसं हा गद्यपाठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

‘मार्गस्थ हे बाबांचे आत्मचरित्र आहे अतिशय नितळ, पारदर्शी; पण तितकेच परखड व खडतर प्रवास उलगडणारे हे लेखन आहे,एक महंत कसा घडतो हे या आत्मकथेतून कळतं.कुठलाही बडेजाव न करता अनेक गुपिते बाबांनी उलगडलेली आहेत.

प्रमुख कार्यक्रम-

राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती द्वारा आयोजित दुसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्ष

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →