बाळ फोंडके

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत.

अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते विज्ञानविषयक लिखाण करतात अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेचा हिस्सा आहेत.

फोंडके यांनी अणुभौतिकीत एम.एस्‌सी. केल्यावर काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी केली, आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसीच्या) प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. वर्षभरानंतर ते त्या केंद्राच्या जीववैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीत असताना त्यांनी रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच्‌.ड़ी. मिळवली. पुढील काळात त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले. बीएआरसीत एकूण २३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले.

बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांनी सहभागी होण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली.

१९८३ साली बाळ फोंडके हे टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे यांना ‘सायन्स टुडे’मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →