बालेंद्र शाह उर्फ बालेन (जन्म: एप्रिल २७, १९९०) हे एक संरचनात्मक अभियंता (स्ट्रक्चरल इंजिनिअर) आणि माजी रॅपर आहेत. त्यांनी ३० मे २०२२ पासून १८ जानेवारी २०२६ पर्यंत काठमांडूचे १५ वे महापौर म्हणून काम पाहिले. काठमांडूचे महापौर म्हणून निवडून येणारे ते पहिले स्वतंत्र उमेदवार होते.
शाह २०१२ पासून नेपाळी हिप-हॉप उद्योगाचा एक भाग आहेत. २०२२ च्या स्थानिक निवडणुकीत, शाह महापौर म्हणून निवडून आले. त्यांनी नेपाळी काँग्रेसच्या उमेदवार श्रीजना सिंग आणि सीपीएन (यूएमएल) चे उमेदवार आणि काठमांडूचे माजी महापौर केशव स्थापित यांचा पराभव केला.
महापौर म्हणून, शाह यांच्या कार्यकाळात कचरा व्यवस्थापन आणि रस्ते वाहतूक नियंत्रण यात चांगल्या सुधारणा झाल्या. परंतु बेकायदेशीरपणे बांधलेल्या खाजगी इमारती पाडणे आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा प्रशासनाद्वारे होणारा छळ यासारख्या जटिल मुद्द्यांवर त्यांच्या कडक दृष्टिकोनामुळे ते अत्यंत वादग्रस्त ठरले. जानेवारी २०२६ मध्ये, शाह यांनी काठमांडूच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आणि २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष (RSP) मध्ये सामील झाले.
बालेन शाह
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.