मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; - चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.
बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.
बालमुरलीकृष्ण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.