डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (१ जून, १९३०/१९३६, - ८ डिसेंबर, २०२५), बाबा आढाव म्हणून प्रसिद्ध, हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे एक नेते मानले जातात. ते केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नसून, सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते.
आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन असंघटित आणि वंचित कष्टकरी (Unorganised Workers), विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हमाल पंचायती'ची स्थापना, ज्याच्या माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले.. यासोबतच, जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' या क्रांतीकारी चळवळीचे नेतृत्व केले.
आढाव यांना डिसेंबर २०२५ च्या सुरुवातीला पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
बाबा आढाव
या विषयावर तज्ञ बना.