जहिरुद्दिन मोहम्मद बाबर (जन्म : १४ फेब्रुवारी १४८३; - २६ डिसेंबर १५३०) हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक-ए-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला. इब्राहिमखान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत (१५२६) पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला व भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया घातला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाबर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!