बाईपण भारी देवा हा २०२३ मधील केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडियाद्वारे करण्यात आली असून यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
शीर्षक गीत ‘बाईपण भारी देवा’च्या चित्रीकरणापर्यंत या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर ’ असे होते. सहनिर्माते अजित भुरे यांनी केदार शिंदेंना चित्रपटाचे शीर्षक बदलून बाईपण भारी देवा असे सुचवले.
चित्रपटाने तिकीट खिडकीवर ५० दिवसांमध्ये ₹९०.५० कोटींहून अधिक कमाई केली. हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आणि २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून उदयास आला. याने मराठी चित्रपट उद्योगासाठी एका दिवसात ₹६.१० कोटींपेक्षा जास्त कमाईचा नवा विक्रम देखील रचला. हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा महिला केंद्रित चित्रपट आहे.
बाईपण भारी देवा हा समीक्षणात्मक तसेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ठरला. चित्रपटाचे लेखन, कथा, संगीत आणि दिग्दर्शनासाठी प्रशंसा केली गेली आहे. बाईपण भारी देवा हा "ब्लॉकबस्टर" चित्रपट ठरला.
बाईपण भारी देवा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.